मुंबई, कुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायातील निदेशकांच्या रिक्त जागांची भरती जाहीर झाली असून या रिक्त जागा ...
मुंबई,
कुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायातील निदेशकांच्या रिक्त जागांची भरती जाहीर झाली असून या रिक्त जागा तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरल्या जाणार आहेत.
या भरतीमध्ये इलेक्ट्रिशियन २, फिटर (जोडारी) २, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टीम मेन्टेनन्स १, यांत्रिक प्रशीतन व वातानुकुलीकरण २, कातारी (टर्नर) ४, इन्स्ट्रूमेंट मॅकॅनिक १ इतक्या रिक्त जागा तासिका तत्वावर भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली असून संबंधित व्यवसायाचे आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र, एनसीव्हीटीचे प्रमाणपत्र, एटीएस उत्तीर्ण व दोन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्र तसेच अनुभव प्रमाणपत्राच्या प्रतींसह औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.