नगर : विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आपल्या आवडीच्या क्रिडा खेळात सहभागी व्हावे, विविध खेळांमध्ये करियर करण्याची संधी उ...
नगर : विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आपल्या आवडीच्या क्रिडा खेळात सहभागी व्हावे, विविध खेळांमध्ये करियर करण्याची संधी उपलब्ध आहे, खेळाच्या माध्यमातून आपला सर्वांगिण विकास होत असतो, त्यामुळे शिक्षणासोबतच क्रिडा क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे, लहान वयातच विद्यार्थ्यांनी खेळाचे गुण आत्मसात करावे, जय बजरंग युवा सांस्कृतिक क्रिडा ग्रामीण शैक्षणिक मंडळ व अ.नगर जिल्हा किक बॉक्सिंग स्पोर्ट असो. च्या वतीने वर्षभर विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून दिले जाते, स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जातो. खेळात यश संपादन करण्यासाठी मेहनतीची खरी गरज आहे, असे प्रतिपादन उद्योजक अनिल जोशी यांनी केले.
जय बजरंग युवा सांस्कृतिक क्रिडा ग्रामीण शैक्षणिक मंडळ व अ.नगर जिल्हा किक बॉक्सिंग स्पोर्ट असो.च्या संयुक्त विद्यमाने जुनियर व सिनियर जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न झाले यावेळी उद्योजक अनिल जोशी यांच्या समवेत माजी नगरसेवक नितीन शेलार, गणेश कुसळकर, सचिन मकासरे, महेंद्र कुसळकर, गोकुळ सोलाट, संदीप बोरुडे, ओंकार झोडगे, सिद्धिता दरेकर, जय फिरके, अविनाश शिंदे, ज्ञानेश्वर जमदाडे, अमित साळवे, महादेव जाधव आदी उपस्थित होते.
माजी नगरसेवक नितीन शेलार म्हणाले की, जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन होणे काळाची गरज आहे, जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत २०० खेळाडू सहभागी झाले होते, या स्पर्धेत प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप जे.के. मार्शल आर्ट जामखेड रोड यांनी पटकावले. या खेळाडूंना सचिन मकासरे यांचे मार्गदर्शन लाभले, द्वितीय क्रमांक जामखेड तालुका संघ यांनी पटकावले असून त्यांना मार्गदर्शन ज्ञानेश्वर जमदाडे यांचे लाभले, तृतीय क्रमांक वडगाव गुप्ता संघाने पटकावले असून यांना सिद्धिता दरेकर यांनी मार्गदर्शन केले.
विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक व प्रमाणपत्र देण्यात आले, या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आलीये.
COMMENTS