नगर : महा ऑनलाईन सेवा सर्व्हर डाऊन असल्याने विद्यर्थ्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रमाणपत्र / दाखले यांची कार्यप्रणाली सुटसुटीत त...
नगर : महा ऑनलाईन सेवा सर्व्हर डाऊन असल्याने विद्यर्थ्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रमाणपत्र / दाखले यांची कार्यप्रणाली सुटसुटीत तसेच जलद गतीने करून प्रवेश प्रक्रियेत व स्कॉलरशिपमध्ये मुदतवाढ मिळावी आताच 10 वी व 12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या शैक्षणिक दाखले (उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल, जातप्रमाणपत्र, जात पडताळणी, नॉन क्रिमीनल आदी) सह दाखले अत्यंत महत्त्वाचे असून या दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांना दररोज हेलपाटे मारावे लागतात.
'दाखले देणारी महा ऑनलाईन सेवा सर्व्हर डाऊन असल्याने विद्यर्थ्यांना दाखले मिळत नसून ही चूक शासनाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळत नाही. या गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये मुदतवाढ देण्यात यावी. जेणेकरून महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची पिळवणुक होणार नाही. दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना व पालकांची नाहक हेळसांड होत असून सेतु बाहेर तासंतास उन्हामध्ये हजारो विद्यार्थी उभे असतात.
तसेच काही विभागामध्ये एंजट असून अधिकाऱ्यांच्या संगनमताने विद्यार्थ्यांची आर्थिक लुट होत असल्याचे निदर्शनास येते. या सर्व गोष्टींकडे लक्ष चालून या कार्यप्रणालीमध्ये सुसज्जता आणावी व विद्यार्थ्यांना तातडीने दोन दिवसात मागणी केलेले प्रमाणपत्र मिळावे अन्यथा आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा राष्टवादी विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी प्रांताधिकारी यांना निवेदनातून दिला
यावेळी ऋषिकेश बागल, विलास वायभासे, अनिकेत कोळपकर, राधेय दांगट, राहुल नेटके, ओंकार आव्हाड, शिवप्रसाद पालवे, जय सानप आदी उपस्थित होते.