नगर : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र असून भाविकवर्ग दर्शनासाठी येत असतात याचबरोबर नगर शहरांमध्ये ऐतिहासिक भुईकोट किल...
नगर : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र असून भाविकवर्ग दर्शनासाठी येत असतात याचबरोबर नगर शहरांमध्ये ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शहरात दोन म्युझिकल फाउंटन मंजूर असून त्यामधील बुरुडगाव रोड साईनगर उद्यान येथे म्युझिकल फाउंटनचे काम सुरु असून लवकरच नगरकरांसाठी ते खुले होणार आहे, याचबरोबर सावेडी गंगा उद्यान येथे म्युझिकल फाउंटनचे काम लवकरच सुरु होईल, नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच शहरात दोन म्युझिकल फाउंटन साकारत आहे त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने पाहण्यासाठी येतील या म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना मिळेल, पर्यटनांमुळे रोजगार निर्मिती होत असते, हे भव्य दिव्य म्युझिकल फाउंटन नक्कीच पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल यामुळे शहराचाही नावलौकिक वाढेल आणि महानगरचे रूप प्राप्त होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून साकारत असलेल्या बुरुडगाव रोड साईनगर उद्यान येथील म्युझिकल फाउंटनच्या कामाची पाहणी करण्यात अली यावेळी ते बोलत होते,या प्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त पंकज जावळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, शहर अभियंता मनोज पारखे, इंजि.श्रीकांत निंबाळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, अंकल चवंडके आदी उपस्थित होते.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, साईनगर उद्यानमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून भव्य दिव्य स्वरुपात म्युझिकल फाउंटन साकारत असून याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे ते लवकरच नगरकरांना पाहण्यासाठी खुले होईल. विद्युत रोषणाई तसेच संगीत आणि विविध गाण्यांच्या तालावर नाचणारा हा म्युझिकल फाउंटन पर्यटकांच्या मनपसंतीस उतरेल असे ते म्हणाले.