नगर : शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे, यात विद्यार्थ्यांना करियर करण्याच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत, विद्यार्थ्यांना...
नगर : शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे, यात विद्यार्थ्यांना करियर करण्याच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत, विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादित करता येते. गवांदे क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले आहे. गवांदे क्लासेसने उच्चांक निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्याना करियर बाबत योग्य मार्गदर्शन केले जाते. गवांदे क्लासेसच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत असून यशस्वी विद्यार्थी घडवण्याचे काम गवांदे क्लास करत आहे असे प्रतीपादन संचालक प्रा. प्रभाकर गवांदे यांनी केले
नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वी MHT-CETI (Maths) परीक्षेत गवांदे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी गणित विषयात निकालाचा उच्चांक प्रस्थापित करून यश मिळवले आहे. या गुणवत विद्यार्थ्यांचा सत्कार संचालक प्रा.प्रभाकर गवांदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यवस्थापक युवराज महांडूळे व विद्यार्थी उपस्थित होते.
१२ वी बोर्ड परिक्षेत ११ विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९० पेक्षा जास्त गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यामध्ये प्रतिक मोरे ९७ टक्के, गौरव सुंबे ९४, साहिल जाधव ९४, अनिकेत लोखंडे ९२, भूषण लोडे ९२. कोमल वराळे ९२, ऋतुजा दराडे ९१, प्रणव कोरडे ९१, कृष्णा मोटे -९१, शुभम खिलारे - ९० आणि ऋतुराज गर्जे -९० तसेच क्लासेच्या ५४ विद्यार्थ्यांनी ८० पेक्षा जास्त गुण मिळविले आहे.
MHT-CET म्हणजेच अभियांत्रिकेच्या प्रवेश परिक्षेत गवांदे क्लासेसच्या विद्याथ्र्यांनी यश मिळविले आहे.
सदर परीक्षेत ३२ विद्याथ्र्यांनी पैकी ९० पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत, यामध्ये कु. गौरी गेरंगे - ९७.२७, प्रणव कोरडे- ९६.४४. कु. अक्षदा बिडे-९६.१३ शंकर नांदे-९५.३६, महेश खेडकर - ९५.२२, तुषार आहेर - ९५.२२, भूषण लोंढे - ९४.०१, महेश येवले - ९३.९३, ओंकार शिंदे -९३.२३, जय झिजांड -९३.२३, गौरी शिंदे - ९२.६८, अर्जुन गळगटे - ९१.९६, हर्षल सातपुते ९१.७६, कृष्णा मोटे ९१.०९ कु. ऋतुजा रोकडे -९१.०३, कु.ऋषाली रोकडे - ११.०३, प्रतिक मोरे ९०.८९, कार्तिक पांडुळे - ९०.८९, प्रसाद लांडगे - ९०,८८, सिध्देश जंबे - ९०.८८, हर्षद पोकळे ९०.०१, स्नेहल शिंदे - ९०.०८, कु. वैष्णवी गांगर्डे -९०.०७, कु.अंकिता झाडे ९०.०१, प्रणव शेटे- ९०.०४, सुबे गौरव ९०.०४ तसेच ७२ विद्यार्थ्यांनी ८५% पेक्षा जास्त गुण मिळविले आहे. सदर बहुतांशी विद्यार्थ्यांचे इंजिनिअरींगचे स्वप्न केवळ गणित विषयातील गुणामुळे साध्य होणार आहे.
JEE म्हणजेच केंद्र सरकारच्या प्रवेश परीक्षेत सुध्दा गवांदे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिध्द केली आहे सदर परीक्षेत १८ विद्याथ्र्यांनी ८०% पेक्षा जास्त गुण मिळविले आहे या परीक्षेत
शुभम खिलारे ९६.०१ शुभम ढवळे- ९३.५६, शंशाक काळे- ९०.७१. आणि महेश तुंगर - ९१.१९ आणि २८ विद्यार्थी JEE (Advance) म्हणजेच IIT च्या प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरले. सदर तिन्हीही परीक्षेत गवांदे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी क्लासेसची दरवर्षी सर्वोच्च निकालाची परंपरा पुढे जोपासली आहे. या सर्व यशस्वी विद्याथ्यांचे क्लासेसचे संचालक प्रा. प्रभाकर गवांदे, छायाताई गवांदे व्यवस्थापक युवराज महांडुळे आणि सहव्यवस्थापिका मोनाली पवार, किशोर गिते, प्रविण पहिलवान आदींनी अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
गवांदे क्लासेसने मागील २० वर्षापासुन निकालाची उच्च परंपरा या वर्षीही कायम जोपासली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी गवांदे क्लासेसचे संचालक प्रा. गवांदे सरांची गणित विषय सोप्या पद्धतीने शिकविण्याचे कौशल्य, प्रदिर्घ अनुभव आणि फक्त क्लासेसच्या विद्यार्थ्यासाठी उपलब्ध केलेल्या अत्याधुनिक अद्यावत ई-सुविधा यामूळेच एवढे अभूतपूर्व यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सदरील विद्यार्थ्याच्या यशाबद्दल प्रा. गवांदे सर यांनी यावेळी सांगितले की आम्ही कठोर परिश्रमावर भर देतो. विशेषकरून ११वी मध्ये पाया पक्का करण्यावर भर देतो. मूलभूत संकल्पना जास्तीत जास्त स्पष्ट करतो. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी उत्तुंग यश मिळवितो. या वर्षी विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळविलेले यश उल्लेखनिय आहे. उजळणी आणि सराव यावरती जास्त भर देऊन विद्यार्थ्याची तयारी करून घेतली.
क्लासेसच्या क्षेत्रातील विद्यार्थ्याना प्रेरित करणारा उत्कृष्ट शिक्षक अशी प्रा. गवांदे सरांची ख्याती विद्यार्थी वर्गामध्ये ऐकायला मिळते. त्यांचा सुट्टीचा योग्य वापर करण्यावर भर असतो. रविवारी, उन्हाळीसुट्टी व दिवाळीसुट्टीत जादा क्लासेस घेतले जातात. बोर्ड आणि प्रवेश परिक्षेसाठी जास्तीत जास्त सराव पेपर वर्गात सोडवून घेतले जातात.
या क्लासेसच्या अद्यावत व अभिनव सेवा-सुविधा ही या क्लासचे स्वतःचे काही वैशिष्टये विद्यार्थ्यामध्ये चर्चिले जातात. गवांदे क्लासेसने पुणे पॅटर्नच्या धर्तीवरच्या सुविधा अल्प फी मध्ये नगर मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. ते म्हणजे विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष्य ठेवण्यासाठी २४ CCTV कॅमेरे, विद्यार्थ्याच्या दैनंदिन हजेरी साठी बायोमॅट्रिक सिस्टीम पालकांना वेळोवेळी विद्यार्थ्याच्या प्रगतीची SMS व्दारे माहिती कळविली जाते. अद्यावत डिजीटल साउड सिस्टीम, On-Line Test साठी भव्य कॉप्युटर लॅब, क्लासेसचे मध्यवर्ती ठिकाण, बोर्ड CET & JEE साठी भव्य ग्रंथालय आणि स्वंतत्र अभ्यासिका, पार्किंगची मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि मुलींसाठी स्वतंत्र लेडीज रूम, यशाची १०० टक्के खात्री यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये या क्लासमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे बोलले जाते.
प्रा. गवांदे सर हे स्वतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गणित विषयातील सुवर्णपदक विजेते आहेत. त्यांना ११ वी व १२ वी गणित शिकविण्याचा २२ वर्षाचा प्रदिर्घ अनुभव आहे. परंतु दरवर्षी विद्यार्थ्यांना नवीन काही तरी देण्यावर त्यांचा भर असतो. आजही ते स्वतःदिवसातील १४ ते १५ तास क्लासमध्ये विद्यार्थ्याच्या हितासाठी काम करतांना दिसतात. त्यामुळेच कदाचित अवघड गणित अतिशय सोपे करून शिकविण्याची त्यांच्या कलेचा लौकिक झालेला असावा. गवांदे क्लासेस मध्ये इ. ११ वी व १२ वी गणिताच्या बोर्ड, CET & JEE साठी मार्गदर्शन वर्ग चालतात.
यावर्षी इयत्ता ११ वी गणितसाठी बचेस १ जुलैपासून नियमित सुरु होत आहे तरी विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भवितव्यासाठी गवांदे क्लासेसशी संपर्क साधत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन प्रभाकर गवांदे सर यांनी केले आहे.
COMMENTS