नगर : कीर्तनाच्या माध्यमातून संतांचे विचार समाजामध्ये रुजविण्याचे काम होत असते. कुटुंबातील महिला संस्कारीत असेल तर संपूर्ण कुटुं...
नगर : कीर्तनाच्या माध्यमातून संतांचे विचार समाजामध्ये रुजविण्याचे काम होत असते. कुटुंबातील महिला संस्कारीत असेल तर संपूर्ण कुटुंब सुसंस्कृत होत असते, त्यामुळे संस्काराची खरी जबाबदारी महिलांवर असते जगामध्ये भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जात असून त्यांच्या जीवावर महासत्ता बनेल पण या युवकांना चांगले संस्कार देण्याची जबाबदारी आई-वडिलांची आहे.
जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्याचे काम केल्यामुळे महाराष्ट्राला रत्न प्राप्त झाला तरुणांना आपापल्या क्षेत्रामध्ये उंचीवर जायचे असेल तर जीवनात त्याग महत्त्वाचा आहे. जिथे जिथे नारीचे पूजन होते, तिथे तिथे सर्व देवाचे वास्तव्य असते. आपल्या सनातन धर्मामध्ये नारीला मुख्य मानले आहे, नारी एक शक्ती आहे तिच्यामुळे घराला घरपण मिळते. बारस्कर कुटुंबियांच्या वतीने वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत समाजाला चांगला संदेश देण्याचे काम करण्यात आले असे प्रतिपादन हभप शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले
अहमदनगर मधील सावेडी भिस्तबाग महल येथे कै.विजय बारस्कर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आयोजीत कीर्तन महोत्सवात दुस-या दिवशी सारेगमप विजेती अंजली व नंदिनी गायकवाड यांचा भजनाचा कार्यक्रम तसेच हभप शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे हरिकीर्तन संपन्न झाले यावेळी हभप शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी आपल्या कीर्तनातून शुद्धबीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ।। मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी ।। सर्वांग निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ।। तुका म्हणे जाती या अभंगाचे विश्लेषण केले.
दरम्यान सारेगमप विजेती अंजली व नंदिनी गायकवाड यांनी देखील यावेळी आपल्या सुमधुर आवाजाने भजन गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, दरम्यान उपस्थित महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करून समाजाला वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.
COMMENTS