काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला राजीनामा


मुंबई - 
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर नैतिक जबाबदारी स्विकारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राज्यात काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

उत्तर प्रदेशातली काँग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्विकारात राज बब्बर यांनीही राजीनामा दिला आहे. तर अमेठीत राहुल गांधी यांची जबाबदारी स्विकारून जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीही राजीनामा दिला आहे.

काल काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये स्वत: राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम होते. परंतू पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलेे होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post