'भोंगा'ने पटकावला उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार


मुंबई - 
वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला आहे. ५६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोह‍ळ्यामध्ये यंदा उत्कृष्ट चित्रपट भोंगा ठरला असून उत्कृष्ट अभिनेता के. के. मेनन आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे यांनी पुरस्कार पट‍काविला आहे.

५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा दिमाखदार सोहळा आज ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उज्ज्वल निरगुडकर, संकलक कॅरॉल लिटलटन, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या पत्नी वर्षा तावडे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील शिंदे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. या चित्रपट सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळी उपस्थित होती

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post