मुंबई : भारतीय हवामान विभागाने शनिवारी अंदमानात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे. मान्सून प्रत्यक्ष राज्यात दाखल झाला नसला तरी त्या...
मुंबई :
भारतीय हवामान विभागाने शनिवारी अंदमानात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे. मान्सून प्रत्यक्ष राज्यात दाखल झाला नसला तरी त्याच्या अंदमानातील आगमनाच्या वार्तेनेही उन्हाळ्याची तीव्रता कमी झाल्याची जाणीव झाली.
पावसाला घेऊन येणारे मोसमी वारे अर्थात नैर्ऋत्य मान्सून अंदमान समुद्र, अंदमान-निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात दाखल झाले आहेत. तसेच पावसासाठी अनुकूल वातावरण राहिले आणि पावसाचा हा प्रवास असाच चालू राहिला तर येत्या ६ जूनपर्यंत केरळमध्ये पाऊस दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले की मग गोवा-कोकणमार्गे पाऊस राज्यात प्रवेश करेल. मान्सूनचा प्रवास असाच सुरू राहिला तर हवामान विभागाने अंदाज वर्तवल्याप्रमाणे वेळेआधी मान्सून देशात दाखल होण्याची शक्यता आहे.