खुनाचा प्रयत्न करून पळालेला आरोपी २४ तासात पकडला


अहमदनगर : DNALive24
खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपीला 24 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले. गुन्हयात वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक ईशु सिंधु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गोरख मारुती गोरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात 27 रोजी चार अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गुन्हयातील आरोपी नामे आदित्य उर्फ निरंजन शाम अहिरराव, वय -२६ वर्षे रा.काळेवाडी, स्वप्निल राजेंद्र गाडे, अभिषेक नरेंसिंग माडगुळे, अजय सटवा म्हस्के यांना अटक केली आहे. तसेच गुन्हयात वापरलेली बलेनो कार नं. एम.एच.१४.जी.एन.७७१३ जप्त केली आहे. आरोपी आदित्य वर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post