शपथविधीआधीच नरेंद्र मोदींचे परदेश दौऱ्यांचे वेळापत्रक तयार


नवी दिल्ली - 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवले आहे. 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीनंतर मोदी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यांसाठी सज्ज झाले आहेत. शपथविधी होण्यापूर्वी मोदींचे परदेश दौऱ्यांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

सर्वप्रथम नरेंद्र मोदी शांघाय सहकार संघठनेच्या किर्गीस्तान येथे होणाऱ्या शिखर परिषदेला हजेरी लावणार आहेत. ही बैठक 14-15 जूनदरम्यान होणार आहे. या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित राहणार आहेत.

28-29 जून दरम्यान नरेंद्र मोदी जपानमधील ओसाका येथे होणाऱ्या जी 20 शिखर परिषदेला हजर राहणार आहेत. या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह जगभरातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

2014 साली पंतप्रधान मोदींनी भुतानपासून परदेश दोऱ्यांना सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे मोदी यावर्षीदेखील 'पडोसी पहले' या तत्वानुसार यंदादेखील भारताशेजारच्या देशाला सर्वप्रथम भेट देतील, अशी चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post