सीमेवरील घुसखोरी रोखणारं RISAT-2B सॅटेलाइट लॉन्च


DNALive24 : India
इस्रोने आज (बुधवारी) पीएसएलव्ही-सी४६ सोबत RISAT-2B हा उपग्रह अंतराळात लॉन्च केला असून या उपग्रहाद्वारे भारत-पाकिस्तान सीमेवर वॉच ठेवण्यात येणार आहे. सीमेपलिकडून भारतात होणारी घुसखोरीही रोखण्यासाठी
यामुळे मदत होणार आहे. शेती, वन आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.
बुधवारी (दि.२२) पहाटे ५ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLVC46 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर PSLVC46 ने पृथ्वीची निगरानी करणाऱ्या RISAT-2B या उपग्रहाला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत यशस्वीपणे सोडण्यात आले. रीसॅट-२बीमुळे हवामानाचा अंदाज घेता येणार आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटाचा सामना करणे सोपे होणार आहे. रीसॅट-२बी सोबतच सिंथेटिक अपर्चर रडारही अंतराळात लॉन्च करण्यात आले आहे. त्याचा दूरसंचार क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, हा उपग्रह अंतराळात सोडण्यापूर्वी इस्रोचे चेअरमन के. सीवन यांनी तिरुपतीच्या तिरुमला मंदिरात जाऊन पूजा केली होती. कोणत्याही उपग्रहाला अवकाशात सोडण्यापूर्वी तिरुपतीच्या वेंकटेश्वर मंदिरात जाऊन पूजा करण्याची इस्रोची परंपरा असल्याने ही पूजा करण्यात आली. या उपग्रहाद्वारे अंतराळातून जमिनीवरील ३ फुटापर्यंतचे फोटो घेता येणार आहेत. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर या सीरिजचे सॅटेलाइट विकसित करण्यात आले होते. या उपग्रहाचं वजन ६१५ किलोग्रॅम आहे. प्रक्षेपणानंतर हा उपग्रह १५ मिनिटाने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सोडण्यात आला. 

2016 मधील सर्जिकल स्ट्रईकसाठी Risat मालिकेतील याआधीच्या उपग्रहाचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्टाईकसाठी देखील Risatची मदत घेण्यात आली होती. इतक नव्हे तर या उपग्रहाने अनेक नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोठी मदत केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post