जिल्ह्यात 12-0 ; राज्यात पुन्हा युतीचेच सरकार - राधाकृष्ण विखे पाटील


वेब टीम, अहमदनगर
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा युतीला दिल्या असून यात समाधानी आहे. या निवडणुकीत राज्याचे नेते म्हणणाऱयांचे काय झाले हे सर्वांना माहीत असल्याचा टोला आ. बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला. आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 12- 0 होणार असल्याचा विश्वास माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार असून युतीचा ऐतिहासिक विजय होणार असल्याचेही ते म्हणाले.
आज नगर येथे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी  यांची  भेट घेतली, भेटीनंतर  त्यांनी  पत्रकारांशी संवाद साधला.
      राज्यात मुख्यमंत्री यांचे काम चांगले असून ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post