रविवार- सोमवारी शहराचा पाणीपुरवठा विस्कळित


वेब टीम, अहमदनगर
महापालिकेने पाणी योजनेच्या दुरुस्तीचे काम येत्या शनिवारी (८ जून) करण्याचे निश्चित केले असल्याने रविवारी (९ जून) व सोमवारी (१० जून) शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे. दुरुस्ती कामाच्यावेळी मुळा धरणातून पाणीउपसा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकणार नसल्याने दोन दिवस पाणीपुरवठा पुरेशा दाबाने होणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

मध्य शहरात सोमवारी पाणी पाणीपुरवठा वेळापत्रकानुसार रविवारी (९ जून) शहराच्या मध्यवस्तीतील मंगल गेट, झेंडी गेट, डाळमंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, तसेच सावेडीतील गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको या भागात होणारा पाणीपुरवठा रविवारी बंद ठेऊन तो सोमवारी (१० जून) होणार आहे. 

तर सोमवारी पाणीपुरवठा होणार असलेल्या सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रोड, कापड बाजार, माळीवाड्यातील काही भागास मंगळवारी (११ जून) पाणीपुरवठा केला जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post