ठग्ज ऑफ महाराष्ट्र म्हणणारे विखे ठगांमध्ये जाऊन बसले : अजित पवार


वेब न्यूज : मुुंबई
विरोधी पक्षनेता असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडला. विखे पाटलांनी ठग्ज ऑफ महाराष्ट्र म्हणत ज्या सरकारला हिणवले तेच विखे आज ठगांमध्ये जाऊन कधी बसले ते आम्हाला कळलेच नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी लगावला.
ज्या विखे पाटील यांनी मुंबईचा नवीन प्रारुप विकास आराखडा मंजूर करताना एक लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला. त्यापैकी दहा हजार कोटी थेट मुख्यमंत्री कार्यालयाला पोहचल्याचा आरोप केला. तेच विखे पाटील आज मुख्यमंत्र्यांच्या बाजुला बसले आहेत. हे आरोप खरे की खोटे होते ते विखे पाटील यांनी जाहीर करावे, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी विनोद तावडे यांचे शिक्षण खाते काढून आशिष शेलार यांना दिल्यावरुनही चिमटे काढले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post