मनपा कामगार संघटनामधील वाद उफाळला : नवीन संघटने सोबत गेल्याने एकला धमकावले; गुन्हा दाखल


वेब टीम : अहमदनगर
महापालिकेच्या कामगार युनियन मध्ये फूट पडली असून महापालिके आणखी एक कामगार संघटना स्थापन झाल्यामुळे दोन्ही संघटनेत वादाची ठणगी पडली आहे.

महापालिकेतील श्रमिक कामगार संघटनेत सदस्य असतांना देखील नव्याने तयार झालेल्या महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेत गेल्याने मनपा कर्मचाऱ्यास घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. गुरुवारी (दि.१३) दिल्ली गेट येथील मुन्सिपल कॉलनी येथे ही घटना घडली.

विजय राजू पठारे व इतर तीन जणा विरोधात याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपा कर्मचारी जितेंद्र चव्हाण यांच्या पत्नी अनिता जितेंद्र चव्हाण यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे पती जितेंद्र चव्हाण हे महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरीस आहेत. महापालिकेत सफाई कामगार संघटना असून त्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे आहेत. या संघटनेत माझे पती सदस्य म्हणून आहेत. १३ जून २०१९ रोजी महापालिकेत नवीन संघटना काढण्यात आली. त्यात माझ्या पतीसह तानसेन सुरेश बिवाल, नागेज कंडारे, ऋषिकेश भालेराव, विठ्ठल उमाप, प्रकाश छललानी आहेत. चव्हाण हे नवीन संघटनेतील पदाधिकाऱ्यांसोबत शाखा स्थापन करण्यासाठी महापालिकेत गेले होते. त्याचा राग मनात धरून माझ्या घरी विजय पठारे व इतर तीन जण काल गुरुवारी(दि.१३) घरात घुसले. तुझ्या पतीला समजावून सांग, तो जास्त शहाणा झाला आहे का ? महापालिकेत एक संघटना आहे तू हे चुकीचे करत आहे. संघटना एकच राहील. असे म्हणून मारण्याची धमकी दिली.

अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेची शाखा महापालिका सुरू करण्यास मदत करू नको. त्यांच्या सोबत राहू नको असे तुझ्या पतीस सांग. तो चुकीचे करत आहे, हे थांबव. असे म्हणून पतीस मारण्याची धमकी दिली. त्यानंतर झालेला प्रकार मी माझ्या पतीस सांगितला. पतीने विजय पठारे यास फोन करून तू आमच्या घरी का आला होता. असे विचारले असता त्याने तू चुकीचे करत आहे. सारी वस्ती घेऊन तुझ्याकडे पाहतो असा दम दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post