महाराष्ट्र : पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच


वेब टीम, नाशिक 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दरबारी केंद्रीय मंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहांच्या हजेरीत राज्यातील भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. तसेच शिवसेने बरोबरच्या युतीबाबत शाश्वती देखील देण्यात आली. तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना युती जरी असली तरी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री मात्र भाजपचाचं असेल असे अमित शाह म्हणाले.

भाजपच्या या बैठकीनंतर शिवसेनेमध्ये काहीशी नाराजी असल्याच दिसत आहे. तर दुसऱ्याबाजूला आता राज्यातील भाजपच्या नेत्यांनी देखील मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. 

राज्यात आमचे ४१ खासदार असल्याने पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे सूचक वक्तव्य वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिकमध्ये केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post