सिव्हिलमध्ये रुग्णाकडून डॉक्टरला धक्काबुक्की


वेब टीम

अहमदनगर - एका रुग्णाने डॉक्टरलाच शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये शुक्रवारी (दि.१४)सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डॉ.अशोक रामचंद्र खटके यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संदीप हरिभाऊ शेंडेकर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

शुक्रवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ.अशोक रामचंद्र खटके हे ड्युटीवर होते. त्यांनी मारामारीत जखमी झालेल्या संदीप शेंडेकर यांच्यावर उपचार केले. उपचार केल्याबद्दल शेंडेकर यांने तुम्ही माझ्यावर उपचार कसं काय केला. असे म्हणत सिव्हिल मध्ये आरडाओरडा सुरू केली. त्यावेळी डॉ.खटके याना शिवागीळ करत धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post