स्वस्तात सोन्याचे अमिष दाखवून एकाला लाखो रुपयाला गंडावेब टीम, कर्जत
स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून पारनेर तालुक्यातील राळेगण सिध्दी येथील दत्तात्रय गाजरे यांची कर्जत तालुक्यातील तिघांनी फसवणूक केल्याची घटना घडली  आहे.

याबाबत सविस्तर असे की, दत्तात्रय गणपत गाजरे (रा.राळेगण सिध्दी ता. पारनेर) यांचा मुलगा व त्यांच्या साडूच्या मुलास कर्जत येथील छल्ली लोण्या काळे, लोण्या ऊर्फ वच्छा काळे,विशाल लोण्या काळे,(सर्व रा.कर्जत) यांनी आमच्याकडे सोने सापडले आहे.  आम्ही तुम्हाला स्वस्तात देतो असे आमिष दाखवले व ते घेण्यासाठी त्यांना बोलवले.

त्या दोघांना घेवून हे अंबालिका कारखान्याच्या पाठिमागील बाजूस बरकडे वस्ती ताजू या परिसरातील आरोपींच्या घराकडे घेवून गेले. तेथे गेल्यानंतर त्यांच्याकडून ४ लाख रूपये घेवून त्यांना सोन्याऐवजी पितळी अंगठ्या देवून फसवणूक केली.

या प्रकरणी दत्तात्रय गणपत गाजरे यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक माने करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post