'छावण्या बंदनंतर शेतकऱ्यांच्या दावणीला अनुदान द्या'


वेब टीम, अहमदनगर

यंदाचा दुष्काळ तीव्र असून पिण्यासाठी पाणी जनावरांना चारा नाही. सरकारने छावण्या सुरू करून शेतकऱ्यांचे पशुधन वाचवले आहे. परंतु पाऊस पडला तरी जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी दोन महिने लागतात. दुष्काळामुळे अगोदरच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे छावण्या बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना पशुधन वाचविण्यासाठी दावणीला किमान 1 महिन्याचे अनुदान द्यावे अशी मागणी नगर तालुक्यातील खंडाळा येथील शेतकऱ्यांनी ना. दिवाकर रावते यांच्याकडे केली. दरम्यान, ना. रावते म्हणाले, शिवसेनेने छावण्या सुरू करण्यासाठी, अनुदान वाढविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. पाऊस पडल्यानंतर ही लगेच चारा उपलब्ध होणार नसल्याने शेतकरी यांच्या दावणीला अनुदान देण्यासाठी अधिवेशनात प्रश्न मांडून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

रविवार (दि.९ जून) रोजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नगर तालुक्यात दुष्काळ दौरा करून तालुक्यातील अकोळणेर, खंडाळा, खडकी गावातील छावण्यांना भेटी दिल्या. यावेळी शेकऱ्यांना धान्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती विजय औटी, उपनेते अनिल राठोड, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, राजेंद्र दळवी, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, गोविंद मोकाटे, सभापती रामदास भोर, पंचायत समिती सदस्य दीपक कार्ले, तहसीलदार रोहिणी नऱ्हे, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनिल तुंबारे, प्रभारी गट विकास अधिकारी वसंतराव गारुडकर, आनंदराव शेळके, प्रवीण कोठुळे, प्रकाश कुलट, ग्रा. सदस्य महेश कोठुळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत ठराविक शेतकऱ्यांनाच कांदा अनुदान दिले जात असल्याची तक्रार शिवसेनेचे प्रकाश कुलट यांनी केली.

रावते म्‍हणाले, दुष्‍काळ हा खरीप हंगाम संपल्‍यानंतर म्‍हणजेच ऑक्‍टोबर महिन्‍यात दुष्‍काळाबाबत संबंधीत यंत्रणांना सूचना देण्‍यात आल्‍या. पहिल्‍या जनावरांच्‍या छावण्‍या लवकर सुरु झाल्‍या आहेत. नाशिकच्‍या गोदावरी नदीच्‍या पाण्‍यावर नगर, मराठवाडा अवलंबून असतो. यावेळी नाशिक जिल्‍हयात कमी पाऊस झाल्‍याने दुष्‍काळी परिस्थिती निर्माण झाली. छावणीतील जनावरांच्‍या चारा रक्‍कमेत वाढ करण्‍यात आली व टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्‍यात आला. आचारसंहिता संपल्‍यावर छावणतील जनवारांसाठी मुक्कामास असलेल्‍या शेतक-यांना मदत म्‍हणून गहू 10 किलो, तांदूळ 5 किलो व डाळ 1 किलो धान्‍याचे वाटप यावेळी करण्‍यात आले. तसेच अकोळनेर व खंडाळा येथील शेतकरी व महिलांशी श्री दिवाकर रावते यांनी संवाद साधला.

श्री औटी म्‍हणाले, पावसाला लाबल्‍यामुळे छावणीतील पशुधन अडचणीत आहे. तसेच त्‍यांना संभाळणा शेतक-याला मदत म्‍हणून गहू, तांदूळ व डाळीचे वाटप करण्‍यात आले.

या कार्यक्रमास अकोळनेर व खंडाळा छावणीतील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post