नगरमधील चहावाला युवक झळकला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये


वेब टीम, अहमदनगर
अहमदनगर शहरांमधील चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने आपल्या कलेच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त एक आगळावेगळा उपक्रम करावा यासाठी त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोलाज पोट्रेट तयार केले.
यामध्ये त्यांनी या पोट्रेट साठी 300 पेन्सिल व 100 पेनचा वापर केला.

चहाची टपरी चालून त्यावर आपला उदरनिर्वाह करत असणारा तरुण सनी भीमराव माघाडे राहणार झेंडीगेट या तरुणाने महामानवाबद्दल असलेले प्रेम व जयंती निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम करण्याचा त्याने ठरवला. त्यानिमित्त कोलाज पोट्रेट तयार त्यासाठी त्यांला बारा दिवस मेहनत करावी लागली.

 विविध प्रकारचे रंग पेन्सिल वापरून त्यांने कलात्मक असे पोट्रेट तयार केले. पोट्रेट ची नगर शहरासह राज्यभर मोठी प्रशंसा झाली. या कलात्मक पोट्रेट ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड च्या टीमने दखल घेत रेकॉर्ड बुक मध्ये नोंद करत माघाडे याला प्रशस्तीपत्रक, सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान केला.

नगरचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद दिल्याबद्दल नगरच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सनी माघाडे त्याच्या या यशाबद्दल गौरव करून सत्कार केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post