20 वर्षापुर्वीचा 'विक्रम' मोडीत ; सोन्याच्या दरात 'विक्रमी' वाढ


वेब टीम : मुंबई
जागतिक बाजारपेठेत वाढत असलेल्या मागणीमुळे भारतात देखील सोन्याचे भाव वाढताना दिसत आहेत. त्यामुळे तब्बल २० वर्षांनंतर सोन्याच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. आज बाजारपेठेत सोन्याचा भाव तोळ्यामागे विक्रमी ३५००० रुपये झाला असून यात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यामुळे येत्या काळात सोन्याचे भाव हे चढेच राहणार आहेत. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणुकीस सुरुवात झाल्याने जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमतींत वाढ झाली आहे. अमेरिकेतील बँकांनी सोन्यावरील व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे २००० नंतर प्रथमच सोन्याने हि विक्रमी पातळी गाठली आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारात तेलाचे कमी झालेले भाव,अमेरिका- इराण यांचे बिघडलेले संबंध, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात होणारे डॉलरचे अवमूल्यन यामुळे सोन्याचे भाव वाढल्याचे बोलले जात आहे.

मात्र या सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे ज्यावेळी सोन्याचे भाव उच्चांक गाठतात त्यावेळी मंदीसदृश स्थिती उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळे पुन्हा एकदा मंदी येणार काय ?असा प्रश्न उपस्थित होत आहे. याआधी देखील १० वर्षांपूर्वी सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता,त्यावेळी मोठी जागतिक मंदी आली होती. त्यामुळे वर्षाअखेरपर्यंत सोन्याचा भाव ३८,००० चा आकडा गाठू शकतो. मात्र या सगळ्यात ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठी हि आनंदाची बातमी आहे.

दरम्यान, सोन्याचे भाव एकीकडे आभाळ गाठत असताना चांदीचे भाव मात्र मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत. १९९२ नंतर प्रथमच सोने आणि चांदीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे.हे प्रमाण ९३: १ झाले असून यामुळे चांदीचे भाव आणखी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates