जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संपादक सुभाष गुंदेचा यांची फेरनिवड


वेब टीम, अहमदनगर-

नगर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक'नवा मराठा'चे संपादक सुभाष गुंदेचा यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी गुंदेचा यांना पुन्हा अध्यक्षपदावर संधी देण्याची सूचना संघाचे सहचिटणीस विठ्ठल लांडगे यांनी मांडली. तिला सर्वांनी अनुमोदन दिले. त्यानंतर गुंदेचा यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

नगर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांची महासभा रविवारी (दि.९)संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार चौकातील पत्रकार संघाच्या नियोजित भवनात सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती. मागील बैठकीच्या इतिवृत्तास व मार्च २०१९ अखेरच्या हिशेबास मंजुरी देणे, यासह २०१९-२१ या काळासाठी नवीन अध्यक्ष व पदाधिकारी निवड घोषित करणे आदी विषय त्यात होते. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संघाचे सदस्य मुख्तार सय्यद, अशोक खांबेकर, गनिभाई शेख, सुखदेव फुलारी, रामदास ढमाले, मिठूलाल नवलखा,अशोक तुपे, पद्माकर शिंपी, सुधीर मेहता, प्रकाश भंडारे, बाबा जाधव, रमेश कोठारी, समीर मण्यार, अन्वर खान, संजय वाघमारे, राजेश सटाणकर, श्रीराम बागडे, सुनील मुथा, स.म. कुलकर्णी आदींनी यावेळी मनोगते व्यक्त केली.

सुभाष गुंदेचा यांनी पत्रकार भवन उभारणी साठी आज पर्यंत खूप मेहनत घेतली आहे.पत्रकार भवनाची संपूर्ण माहिती व सुरुवातीपासून आज पर्यंतचा प्रवास असलेली सविस्तर माहिती पुस्तिका संघाच्या सर्व सभासदांना सभेपूर्वी पोस्टाद्वारे पोहचविली आहे. हे पत्रकार भवन पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकार सुभाष गुंदेचा यांना सर्वतोपरी मदत करतील, अशी ग्वाही यावेळी सभासदांनी आपल्या मनोगतात दिली. तसेच अनेक पत्रकारांनी यावेळी वैयक्तिक देणग्याही जाहीर केल्या.

सुभाष गुंदेचा यांचे पत्रकार भवनासाठीचे आज पर्यंतचे योगदान आणि हे भवन पूर्णत्वास नेण्यासाठी पुढील दोन वर्षासाठी संघाच्या अध्यक्ष पदाची धुरा पुन्हा एकदा सुभाष गुंदेचा यांच्याकडेच देण्यात यावी अशी सूचना संघाचे सहचिटणीस विठ्ठल लांडगे यांनी मांडली. तिला सर्वांनी अनुमोदन दिले. त्यानंतर गुंदेचा यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर जिल्हाभरातील पत्रकारांच्या वतीने फेरनिवड झालेले सुभाष गुंदेचा यांचा सत्कार करण्यात आला.

पत्रकार भवनाला आचार्य गुंदेचा
यांचे नाव देण्याचा ठराव कायम

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या महासभेत पत्रकार भवनाला दैनिक नवामराठाचे संस्थापक आचार्य चंदनमल गुंदेचा यांचे नाव देण्याचा ठराव १९९३ साली करण्यात आलेला होता. हा ठराव कायम करण्यास या सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. नगर शहरात जिल्हाभरातील पत्रकारांसाठी हक्काचे पत्रकार भवन व्हावे हे आचार्य गुंदेचा यांचे स्वप्न होते. या पत्रकार भवनासाठी त्यांनीच सर्वप्रथम प्रयत्न सुरु केले होते. त्यामुळे आचार्य गुंदेचा यांचे स्वप्न पूर्ण करत त्यांचेच नाव या भवनाला देण्याचे यावेळी पुन्हा ठरविण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post