बिबट्याने केला हल्ला: चौघे गंभीर जखमी


वेब टीम, अहमदनगर
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर शिवारात शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अडीच वर्षांच्या बालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली.

कृष्णा वाल्मिक गायकवाड (वय-अडीच वर्षे) आणि संजय जगन भडांगे (वय ४०) अशी दोन जखमींची नावे आहेत. इतर दोन वनमजुरांची नावे समजू शकली नाहीत.

बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात एकचा खळबळ उडाली आहे. जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर तेथे गेलेल्या दोन वनमजुरांवरही बिबट्याने हल्ला केला. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. बिबट्याच्या अचानक हल्ल्याने परिसरातील अनेकांनी धसका घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post