विखे पाटील, क्षीरसागर घेणार मंत्रीपदाची शपथ


वेेेब टीम : मुंबई
बहुप्रतीक्षित राज्य मंत्रिमंडळ विस्तार या आठवड्यात होणार असल्याची चर्चा मागील दोन आठवड्यापासून सुरु होती, खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील याला दुजोरा दिला होता, मात्र त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चासुरु झाली होती. मात्र अखेर उद्या रविवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप सेनेकडून अनेकांची वर्णी लागणार असल्याच दिसत आहे. तर आयात नेत्यांना देखील भाजप मंत्रिपद देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कॉंग्रेसला अलविदा करत भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद मिळणार आहे. तसेच शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांना देखील मंत्रीपद मिळणार आहे. त्याचबरोबर रिपाईचे अविनाश महातेकर हे देखील मंत्रीपदाचे मानकरी ठरणार आहेत.

बाहेरून आलेल्या नेत्यांना मंत्रिपद देण्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये धुसफूस सुरु आहे. तसेच अनेक भाजप आणि शिवसेना नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री पदावरून शिवसेनेत पेटलेला वाद शांत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पद नाकारले आहे. तसेच शिवसेनेकडून मंत्री पदासाठी नेहमीचं विधान परिषदेवरील आमदारांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विधानसभेवरील आमदारांमध्ये असंतोष पसरला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates