आनंदवार्ता ; मान्सून केरळमध्ये आला


वेब टीम : पुणे
मान्सून केरळ आणि लक्षद्वीपमध्ये धडकला आहे. तसेच कर्नाटकच्या किनारपट्टीवरही पावसाला सुरूवात झाली आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. आता लवकरच पाऊस महाराष्ट्रातही बरसेल अशीही माहिती स्कायमेटने दिली आहे. येत्या आठ ते दहा तासात सोसाट्याच्या वाऱ्यासह अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, परभणी, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा या शहरांमध्ये पाऊस होईल अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तर केरळमध्ये मान्सून धडकला असल्याची माहितीही स्कायमेटने दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post