घरफोडीतील आरोपी मुद्देमालासह अटक एलसीबीची कारवाई


वेब टीम : अहमदनगर

घरफोडी गुन्ह्यातील आरोपी मुद्देमालासह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेेच्या पोलिसांना यश आले आहे. नितीन सोपान पवार (वय21,रा. पानेगाव,ता.नेवासा) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील वाळुंजपाई येथे दि.16 एप्रिल रोजी रात्री कुटुंबांसह घरामध्ये झोपले असताना, घराचा दरवाजा उघडून घरात येऊन रोख रक्कम व मोबाईल असा 73 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद नामदेव कल्याण पवार यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना सदर गुन्हा हा नितीन पवार याने केल्याची महिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुषंगाने पोलिस पथकाने आरोपी पवार याचा शोध घेऊन पानेगाव (ता.नेवासा) येथून ताब्यात घेतले. यावेळी पवार याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरलेले 20 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे तीन मोबाईल काढून दिले. पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी पवार याला पुढील तपासासाठी राहुरी पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.
 स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ सोन्याबापू नानेकर, पोेहेकॉ बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, मनोज गोसावी, पोना रविंद्र कर्डिले, राम माळी, संदीप चव्हाण, विशाल दळवी, रणजित जाधव, रवि सोनटक्के, मेघराज कोल्हे, जालिंदर माने, चालक सचिन कोळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post