अधिवेशनानंतर मुख्यमंत्री पारनेरच्या दौ-यावर


वेब टीम : पारनेर
अधिवेशनानंतर पारनेरच्या दौ-यावर येउन याच दौ-यात पारनेर शहरासाठी शास्वत पाणी योजनेची घोषणा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मुंबई येथे गुरूवारी मान्य केले. शिवसेेनेच्या नगरसेवकांनी विधीमंडळात मुख्यमंत्रयांची भेट घेउन पाणी योजनेसाठी आग्रही मागणी केल्यानंतर फडणविस यांनी मुख्यमंत्री कार्यालयास तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश देत योजनेची घोषणा करण्यासाठी पारनेरला येण्याचे आमंत्रण स्विकारले.
पारनेर शहराला पाणीपुरवठा करणारा हंगा तलाव आटल्यानंतर  शहरवासीयांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. टँकच्या अनियमित फे-या तसेच वाढत्या लोेेकसंख्येचा विचार करता नागरीकांना पाण्यासाठी 10 ते 15 दिवसांची प्रतिक्षा करावी लागते. यंदाही तलाव आटल्यानंतर पाण्यासाठी नगरपंचायतीस मोठा संघर्ष करावा लागला होता. ना. विजय औटी यांनी त्यावेळी मुख्यमंत्रयांशी चर्चा करून सुपे औदयोगिक वसाहतीमधून पाणी उपलब्ध करून दिले. सुपे वसाहतीमधील पाण्यासही मर्यादा असल्याने शहरासाठी कायमस्वरूपी पाणी योजनेची मागणी करण्यात येत होती. ना. औटी यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशिल होते. यापूर्वीही ना.औटी यांच्यासह नगरसेवकांनी याच मागणीसाठी मुख्यमंत्रयांची भेट घेतली होती.
शहराच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर असल्याची जाणीव मुख्यमंत्रयांनाही झाल्यानंतर त्यांनी पारनेरकरांची ही अडचण दुर करण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्याची तयारी दर्शवित गुरूवारी ना. विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना  भेटलेल्या शिष्टमंडळास पाणी योजनेस मंजुरी देण्याचे मान्य केले. त्यांच्या कार्यालयास योजनेचे अंदाजपत्रक तात्काळ तयार करण्याचे निर्देश देत अधिवेशनानंतर या योजनेची घोषणा करण्यासाठी पारनेरचा दौरा करण्याचे त्यांनी मान्य केले.  ना. विजय औटी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात अनिकेत विजय औटी, किसन गंधाडे, दत्तात्रय कुलट, आनंदा औटी, साहेबराव  देशमाने, डॉ. मुदस्सिर सययद, भरत औटी, गणपतराव आंबुले यांचा समावेश होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post