चंद्रकांत दादांनी सांगितली निवडणुकीची तारीख,चला विधानसभेच्या तयारीला लागा


वेब टीम : मुंबई
राज्यातील विधानसभा निवडणुक अवघ्या ३ – ४ महिन्यांवर आल्याने सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे, सत्ताधारी भाजप – शिवसेनेकडून राज्यभरात संघटना बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी 15 ते 20 ऑक्टोबर या कालावधी विधानसभा निवडणुकांना सुरुवात होईल, असे भाकीत वर्तवले आहे.

राज्यातील निवडणुकांचे वेध राजकीय पक्षांसह, कार्यकर्ते आणि जनतेलाही लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने शनिवारी काही जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली. लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळूनही हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप सर्व प्रकारची खबरदारी घेताना दिसत आहे.

सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारकडून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आज बैठक घेतली. या बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला.

चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, “९ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहेत. २०१४ मध्ये १५ ऑक्टोबरला मतदान झाले होते. त्यामुळे यंदा १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल असे म्हटले. लोकसभा निवडणूक यशाच्या पार्श्वभूमीवर आणि दुष्काळ आढावा घेणारी आणि विधानसभा निवडणूक योजना करण्यासाठी आज भाजपची बैठक झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates