शरद पवार आता फक्त बारामतीचे नेते; प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात


वेब टीम : सोलापूर
महाराष्ट्रात सध्या पाण्यावरून राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपच्या जाळ्यात अडकल्यामुळे शरद पवार आता राष्ट्रीय नेते राहिले नसून बारामतीचे नेते झाले आहेत, अशी बोचरी टीका बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसला पक्ष संघटन वाचवायचे असेल तर त्यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर सर्व जागांवर लढवाव्यात, असा सल्‍लाही आंबेडकरांनी दिला.
आगामी विधानसभा निवडणूक तयारीच्या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर गुरुवारी सोलापूर दौर्‍यावर आल्यानंतर डाकबंगला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारवर टीका करताना आंबेडकर म्हणाले, की दुष्काळाबाबत राज्यातील सरकार उदासीन असून भाजप सरकार बेभरवशाचे आहे. छावण्या, पाणी, चारा आदीबाबत सरकारचे दुर्लक्ष असून काही विचारले असता सरकारची भूमिका अशी आहे की, लोक आम्हाल निवडून देतात त्यामुळे विरोधकांचे काहीही ऐकायचे नाही. दुष्काळात जनावरे आणि माणसांना पाणी लागते. दुधाळ जनावरांना एक किलो सुग्रास सरकारने मान्य केला पण अंमलबजावणी नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post