विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाखा वेब टीम, अहमदनगर

दुष्काळाने होरपळल्याने मेघराजाकडे बळीराजा चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

शेतकऱ्यांचे पहिल्याच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथील शाळेसह परिसरातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. थेरवडी येथेही वादळाने जोरदार तडाखा दिला, यात वादळाने उडालेले पत्रे लागून रंगनाथ कांबळे हे जखमी झाले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावली. यात ढवळगाव परिसरात वादळाने अनेक घरावरील पत्रे उडाले. रात्री उशिरा नगर तालुक्यातील कााही गावात सोसायटीच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post