प्रेमी युगुलाने एकमेकांवर पिस्तुल गोळी झाडून केली आत्महत्या


वेब टीम : राजस्थान
जोधपूर येथील सरहदी जिल्ह्यातील बाडमेरमध्ये बुधवारी रात्री एका प्रेमी युगलाने एकमेकांवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनीही पिस्तुलासोबत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर दोघांनीही एकमेकांच्या डोक्यावर पिस्तुल ठेवून गोळी झाडली. सकाळी दोघांचे मृतदेह गावकऱ्यांना दिसले, त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, बाडमेरच्या लीलसर गावात राहणाऱ्या दोघांचे प्रेम संबंध होते. त्या दोघांचे कुटुंबीय या नात्याला तयार नव्हते. बुधवारी दोघेही आपल्या घरातून निघाले आणि गावातील निर्जण स्थळी जाऊन बसले. तिथे त्या दोघांना देशी बनवाटीच्या पिस्तुलासोबत फोटो काढून आपल्या मित्रांना पाठवली.
त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांच्या डोक्यावर पिस्तुल ठेवून गोळी झाडली. यात त्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बिअरच्या काही बॉटलही पडलेल्या होत्या. सकाळी गावकऱ्यांनी मृतदेह पाहीले आणि ओळख पटवली. तरूणाचे नाव शंकर जाट तर तरूणीचे नाव पन्नू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates