योगगुरू रामदेवबाबा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला


वेब न्यूज : मुंबई
योगगुरू रामदेवबाबा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात सदिच्छा भेट घेतली.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे निमंत्रण तसेच राज्यभरातील आयोजन याबाबत योगगुरू रामदेवबाबा यांनी चर्चा केली. राज्यातील या उपक्रमात विविध घटक उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहेत.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद करून समाधान व्यक्त केले.

यावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण व क्रिडामंत्री आशिष शेलार, आमदार राज पुरोहित आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post