रोहित पवार यांची उमेदवारी जाहीर करा


वेब टीम, अहमदनगर

युवानेते रोहित पवार कर्जत-जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढविणार असतील तर त्यांची उमेदवारी लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत केली.

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या पराभवाची कारणे मांडली. या वेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी पराभवाची कारणमिमांसा स्पष्ट करून तालुक्याचा आढावा घेतला. पक्ष तालुक्यात मताधिक्क्यात मागे राहिल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याकडे दिला. मात्र, फाळके यांनी दत्तात्रय वारे यांचा राजीनामा फेटाळला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post