शरद पवार आज मुख्यमंत्रांच्या भेटीला, मांडणार समस्या


वेब टीम, मुंबई
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे आज शुक्रवारी(दि.७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती, पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याचे समजते.

शरद पवार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून यामध्ये शेतकरी कर्जमाफी, राज्यातील दुष्काळ परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची टंचाई या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या बारामतीचा पाणी प्रश्न इरेला पेटला आहे. त्यामुळे या बैठकीत पाणी प्रश्नावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी नेते अजित पवार देखील बैठकीला असणार उपस्थित असणार आहेत. आज दुपारी चारच्या सुमारास बैठक होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post