श्रीरामपूर येथे आज शिवसेनेचा शेतकरी मेळावा


वेब टीम : अहमदनगर
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविवार दि. 23 जून रोजी उद्धव ठाकरे हे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे तसेच त्यांच्या इतर अडीअडचणी सुद्धा सोडवल्या पाहिजे ही भूमिका घेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्या शेतकरी संवाद मिळावे सुरू केले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये रविवारी श्रीरामपूर येथे मेळावा होणार आहे. श्रीरामपुर नेवासा रोडवरील इच्छामणी मंगल कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी पिक विमा केंद्रास भेट देणार आहेत व त्यानंतर शेतकरी संवाद मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना पदाधिकाऱ्यांची तयारी जोरदारपणे सुरू झाले आहे. श्रीरामपूर येथे सभा होत असल्यामुळे या ठिकाणी भगवे वातावरण झाले आहे. मंत्री दादा भुसे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार नरेंद्र दराडे, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, शिवसेनेचे नगर दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व राजेंद्र झावरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तसेच सर्व तालुका प्रमुखांची बैठक होऊन नियोजनाची तयारी केली आहे. उद्धव ठाकरे उद्या श्रीरामपूर येथे पिक विमा केंद्रास भेट देणार आहेत. त्यांच्यासमवेत मंत्री दादा भुसे तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत व त्यानंतर इच्छामणी मंगल कार्यालयामध्ये शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates