धक्कादायक! : वन विभागाच्या कार्यालयात ओली पार्टी


वेब टीम, अहमदनगर
नगर वन विभागाच्या मुख्यालयातच मंगळवार (दि.11) रोजी दुपारी एका वन अधिकार्‍याने सेवानिवृत्ती निमित्ताने सामिश जेवणाची पार्टी दिली. या जेवणावळीला अर्थातच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ-कनिष्ठांना आवर्जून निमंत्रण देण्यात आले होते. मात्र हे सर्व करत असताना वन खात्याच्या सरकारी जागेतील नर्सरीतच दोन बोकड कापण्यात आले. एव्हढेच नव्हे तर जेवणा अगोदर मस्त पैकी ओली पार्टी झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेे वन विभागाचे मुख्यालय चर्चेत आले आहे.


सामिष जेवणाची सर्व तयारी बोकड जागेवर कापण्या पासून शिजवण्याचे काम वनखात्याच्या कार्यालयातच झाले. यामुळे शासकीय जागेत अशा प्रकारे पशु हत्या करणे कितपत उचित आहे. आणि जेवणाच्या ठिकाणी दिसत असलेल्या दारूच्या बाटल्या काय संदेश देत आहेत. असा प्रश्न निर्माण होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates