तीन मंत्र्यांना डच्चू ; या मंत्र्यांना मंत्री पदाची लॉटरी


वेब टीम : मुंबई
राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून सकाळी 11 वाजता विस्तारीत राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. या मंत्रिमंडळात नव्या 13 मंत्र्यांचा समावेश होणार आहे. तर दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह राजकुमार बडोले आणि दिलीप कांबळे यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा फॉर्म्युला 10+2+1 असा असणार आहे. भाजपला 10, शिवसेनेला 2 तर रिपाइंला एक अशी मंत्रिपदं देण्यात येणार आहेतरिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर, शिवसेनेकडून नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात नवीन सदस्यांचा समावेश करुन त्यांना शपथ देण्याचा समारंभ उद्या, 16 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता, राजभवन, मलबार हिल, मुंबई येथे करण्याचे नियोजित करण्यात आला आहे.

या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी
1. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) संभावित कॅबिनेट
2. डॉ. संजय कुटे (भाजप) संभावित राज्यमंत्री
3. सुरेश खाडे (भाजप) संभावित कॅबिनेट
4. योगेश सागर (भाजप) संभावित राज्यमंत्री
5. डॉ. अनिल बोंडे (भाजप) संभावित राज्यमंत्री
6. अतुल सावे (भाजप) संभावित राज्यमंत्री
7. जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) संभावित कॅबिनेट
8. आशिष शेलार (भाजप) संभावित कॅबिनेट
9. तानाजी सावंत (शिवसेना) संभावित राज्यमंत्री
10. परिणय फुके (भाजप) संभावित राज्यमंत्री
11. अविनाश महातेकर (रिपाइं) संभावित राज्यमंत्री
12. बाळा भेगडे (भाजप) संभावित राज्यमंत्री

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates