विखे पाटील यांच्या अडचणी वाढल्या; मंत्रिपदाविरोधात उच्च न्यायालयात याचिका


वेेेब टीम : मुंबई
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेलं मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचे म्हणत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद का दिले ? याचे उत्तर सरकारने द्यावे असे या याचिकेमध्ये म्हटले आहे. दरम्यान, यामुळे राजकीय भ्रष्टाचार बोकाळेल असे देखील सतीश आळेकर यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.

काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भाजपने गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. 17 जून रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांचा सवाल

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सभागृहात राधाकृष्ण विखे – पाटील यांना दिलेल्या मंत्रिपदाबाबत सवाल केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर आता सतीश तळेकर यांनी सरकारच्या या निर्णयाला थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post