वेब टीम : अहमदनगर स्टेशन रस्त्यावरील महापालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा बंद केल्याच्या निषेधार्थ शाळेतील विद्यार्थी व पाल...
वेब टीम : अहमदनगर
स्टेशन रस्त्यावरील महापालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा बंद केल्याच्या निषेधार्थ शाळेतील विद्यार्थी व पालकांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेपूर्वी सभागृहात येऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देत शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
माध्यमिक शाळेच्या शिक्षकांच्या मानधनावर करण्यात आलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचे ठरवत महापालिका प्रशासनाने येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यां ची सेवा खंडित केली आहे यंदाच्या वर्षापासून शाळाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे संतापलेल्या पालक व शिक्षकांनी मनपाच्या सभागृहात येऊन आंदोलन केले.
नगरसेवक संपत बारस्कर व अनिल शिंदे यांनी शाळेच्या प्रश्नासंदर्भात तात्काळ निर्णय घेण्याची मागणी सभागृहात केली. आंदोलकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. महापौर आणि आयुक्तांनी त्यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली. सभा संपताच या संदर्भात बैठक घेऊ, असे महापौरांनी सांगितले. मात्र आंदोलकांचे समाधान झाले नाही.
शेवटी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्तांना त्यांच्या दालनात पाठवून आंदोलकांशी चर्चा करण्याचे आदेश दिले.
मात्र त्यानंतरही विद्यार्थी व पालकांनी आंदोलन सुरूच ठेवले.
त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या प्रशासकीय पूर्तता करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा असे आदेश महापौरांनी यावेळी दिले.