रायगडला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या; अमोल कोल्हेंची संसदेत मागणी


वेब टीम : दिल्ली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर संसदेत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपले म्हणणे मांडतांना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या, अशी मागणी केली.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, १७ व्या शतकात जसे रायगड राजधानी होती, तशीच ती पूर्ववत करावी. स्टॅच्यू ऑफ युनिटीप्रमाणे ती जपायला हवी असे त्यांनी म्हटले.  तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ व्या शतकात किल्ले रायगडाची उभारणी केली. त्यासह अनेक किल्लेही महाराजांनी बांधले.

महाराजांनी या वास्तू ना स्वत:च्या नावे केल्या, ना कुटुंबातील व्यक्तींच्या. शिवाजी महाराजांनी हे किल्ले रयतेची संपत्ती म्हणून जपले. त्यामुळे या किल्ल्यांची पुन्हा नव्याने उभारणी व्हावी, अशी मागणी देखील खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post