रशिया भारताला देणार अँटी- टॅंक मिसाईल; २०० कोटींचा झाला करार


वेब टीम : दिल्ली
भारत रशियाकडून अँटी-टँक मिसाइल ‘स्ट्रम अटाका’ खरेदी करणार आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये 200 कोटींचा करार झाला आहे. मिसाइलला एमआय-35 हेलिकॉप्टरमध्ये लावले जाईल. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपातकालीन नियमांतर्गत रशिकाडून अँटी-टँक मिसाइलसाठी डील झाली आहे, या करारांतर्गत तीन महिन्यात भारताला हे मिसाइल मिळणार आहे.

सुत्रानुसार, अँटी मिसाइलला युद्धक एमआय-35 मध्ये लावल्याने शत्रुंचे टँक आणि इतर शस्त्रांसोबत लढाई करताना फायदा होईल. एमआय-35 भारतीय वायुसेनेचे अटॅकिंग हेलिकॉप्टर आहे. याला अमेरिकेच्या अपाचेच्या जागेवर आणले आहे. भारताला अनेक दिवसांपासून रशियाकडून मिसाइल घ्यायचे होते, पण हा करार एका दशकापासून रखडला होता.

मागच्या आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आपातकालीन स्थितीमध्ये तिन्ही लष्करांकडून होणाऱ्या करारांचे प्रेझेन्टेशन झाले. यात आपातकालीन परिस्थीतीमध्ये उपकरणांच्या खरेदीमध्ये वायुसेना पुढे होती. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती पाहता आपातकालीन स्थितीमध्ये वायुसेनेने अनेक देशांसोबत स्पाइस 2000 स्टँड ऑफ वेपन सिस्टिम आणि अनेक स्पेअर आणि एअर टू एअर मिसाइलची डील केली आहे

भारतीय लष्कर फ्रांसकडून स्पाइक अँटी टँक मिसाइल घेण्याच्या तयारीत आहे. त्यासोबतच रशियाकडून एअर डिफेंस मिसाइल घेतली जात आहे. 14 फेब्रुवारीनंतर झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर तिन्ही लष्करांना आपातकालीन शक्ती देण्यात आली होती. याअंतर्गत लष्कर आपल्या सोईनुसार 300 कोटींपर्यंतचे हत्यारे खरेदी करू शकते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post