घोडेगावात लोकसहभागातून सीसीटीव्ही यंत्रणा


वेब टीम : अहमदनगर

सोनई पोलिस स्टेशन आणि घोडेगाव ग्रामपंचायत यांच्या पुढाकारातून नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे आज शनिवारी सायंकाळी लोकार्पण करण्यात आले.

तसेच सोनई पोलीस स्टेशन अंतर्गत घोडेगाव येथे पोलिस चौकीही सुरू करण्यात आली आहे. या चौकीमध्ये सोनई पोलीस ठाण्यातील चार कर्मचारी कायमस्वरूपी ड्युटीवर राहणार आहेत.

शेवगाव उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे, सोनई पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, घोडेगाव ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र देसरडा, या मान्यवरांच्या हस्ते सीसीटीव्ही यंत्रणा आणि पोलिस चौकीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी घोडेगावातील व्यावसायिक व्यापारी वर्ग तसेच इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोडेगाव येथे राज्य महामार्गावर पोलीस चौकी सुरू झाल्यामुळे या परिसरातील लुटमारीचे प्रकार आणि गुन्हेगारीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post