दाभोलकर हत्या प्रकरण : ॲड. पुनाळेकर, भावेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी


DNALive24 :वेब न्यूज, पुणे
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटकेतील आरोपी ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सीबीआयने केलेल्या तपासात प्रगती नाही, तसेच यापूर्वी पुरेशी कोठडी दिली असल्याचे नमूद करीत विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी हा आदेश दिला.

डॉ. दाभोलकर प्रकरणातील आरोपीस पिस्तूल नष्ट करणे, तसेच भावे याने घटनास्थळाची रेकी केल्याप्रकरणी ॲड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहायक विक्रम भावे यांना अटक केली आहे. मंगळवारी सीबीआय कोठडी संपल्याने दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. भावेकडे तपास करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करणे, तसेच ॲड. पुनाळेकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मोबाइल आणि लॅपटॉपमधील डेटाचे अद्याप विश्‍लेषण झालेले नाही. त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट बाकी आहे. त्यामुळे त्यांना १४ दिवसांची अतिरिक्त सीबीआय कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post