..म्हणून मी साकारली कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका


वेब टीम : मुंबई
सध्या बॉलीवूडची लाडकी दीपवीर ही जोडी कपिल देव यांचा बायोपिक ‘83’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात अभिनेता रणवीर कपिल देव यांची भूमिका साकरणार आहे. तर दीपिका या सिनेमात कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. दीपिकाने रोमी भाटिया यांच्या भूमीकेला होकार दिल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पण दीपिकाने ही भूमिका स्विकारण्याचे कारण एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना स्पष्ट केले आहे.
मुलाखतीत दीपिकाने यामागचे कारण स्पष्ट केले. ती म्हणाली, 'रणवीर माझा पती आहे म्हणून मी ही भूमिका स्वीकारलेली नाही. यामागे खूप मोठे कारण आहे. ही भूमिका आणि माझ्या रिअल लाइफमधील अनुभव यात बरेच साम्य आहे. माझे वडील एक स्पोर्टपर्सन आहेत. त्यामुळे या व्यक्तींच्या रिलेशिनशीप आणि आयुष्यात काय समस्या असतात हे मला चांगले माहीत आहे. एका स्पोर्टपर्सनची पत्नी किंवा मुलगी असणे काय असते याचा अनुभव मला आहे.'
तसेच ती म्‍हणाली, 'मी या सिनेमात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. जी त्यांच्या या सर्व यशात त्यांची मदतनीस होती. विशेषतः ते कर्णधार असताना ती त्याच्या सपोर्ट सिस्टीमचा एक भाग होती आणि हे सर्व मी माझ्या खऱ्या आयुष्यात अनुभवते. एका खेळडूसाठी त्याचे कुटुंब कशाप्रकारे आपल्या स्वप्नांचा त्याग करते. हे मी खूप जवळून पाहिले आहे. जेव्हा ती आपले लक्ष्य गाठतात तेव्हा हा त्यागही संपतो आणि हे मला माझ्या कुटुंबातच पाहायला मिळाले. माझी आई नेहमीच बाबांच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली मी पाहिले आहे. त्यामुळेच मी या भूमिकेसाठी होकार दिला.'

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post