Icc Word Cup 2019 : भारताचा सलग दुसरा विजय, कांगारूला ‘एवढ्या’ धावांनी नमविले


वेब टीम, लंडन

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळविला आहे. वर्ल्डकपमधील भारताचा हा दुसरा विजय आहे. भारताने दिलेल्या ३५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघाला 316 धावापर्यंतच मजल मारता आली. भारताने हा सामना 37 धावांनी जिंकला आहे.

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ३९ व्या षटकात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला पायचीत करून भारताच्या विजयातील महत्वाचा अडथळा दूर केला. त्याच षटकात भुवनेश्वर कुमारने मार्कस स्टोइनीसला त्रिफळाचित केले. त्या पुढील ४० व्या षटकात यजुवेंद्र चेहलने ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. या सलग तीन वीकेटमुळे भारताचा विजयाचा मार्ग सुकर होण्यास मदत झाली. ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स कॅरी आणि नथन कॉल्टर यांनी देखील ऑस्ट्रेलियाच्या विजयासाठी चांगली झुंज दिली पण अखेर त्यांची झुंझ अपुरी पडली. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शरणागती पत्करली.

एकदिवसीय सामन्यात सलग दहा विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताने ब्रेक दिला आहे. ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ रोखण्यास भारताला यश मिळाले आहे. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अयशस्वी ठरलेल्या शिखर धवनने ११७ धावांची दमदार शतकी खेळी फळाला आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates