अहमदनगरमध्ये ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण


DNALive24 : वेब टीम, अहमदनगर
शहरात मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली. कोठला मैदानावर सार्वजनिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

ईदगाहवर अदा करण्यात आलेल्या नमाज नंतर सर्व मुस्लिम बांधवांनी विश्‍वशांती, बंधूपप्रेम, पावसासाठी प्रार्थना केली. या वेळी शुभेच्छा देण्यासाठी विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या सह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नमाजनंतर सामूहिक दुआ करण्यात आली. जगावर येणारी सर्व संकटे दूर करून ईश्‍वराने विश्‍वशांती स्थापन करावी. सर्व मानव जातीमध्ये परस्पर बंधूपप्रेम वाढीस लागावे, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शनी गल्ली, झेंडीगेट येथे ईद मिलनचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post