कनिष्ठ लिपिकास 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले


DNALive24 : वेब टीम, अहमदनगर
कनिष्ठ लिपिक मनोहर आसाराम डोळस, (गोदामपाल) पुरवठा शाखा तहसील कार्यालय शेवगांव जि.  नगर यास तक्रारदाराकडून १५,००० रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले.

हकिगत अशी की, तक्रारदार यांची मुंगी ता.शेवगांव शिवारात शेत जमीन असुन शेतीत जाणेयेणे साठी वहीवाट नसलयाने त्यानी तहसीलदार शेवगांव यांचेकडे मामलेदार कोर्ट अॅक्ट ५(२) प्रमाणे केस दाखल केली होती. त्या केसच्या निकालाची प्रत देण्यासाठी मनोहर आसाराम डोळस वय ५२ वर्षे, धंदा नोकरी कनिष्ठ लिपीक (गोदामपाल) पुरवठा शाखा, तहसील कार्यालय शेवगांव जि.अहमदनगर यांनी दिनांक ०३ जून २०१९ रोजी पंच साक्षीदारा समक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणीत १५,०००/-रूपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम रूपये १५,०००/- ही शेवगांव तहसील कार्यालयाचे पोर्च समोर आवारात तक्रारदार यांचेकडुन पंच साक्षिदारासमक्ष स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

सापळा रचून ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कुड़ासने, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, .निलेश सोनवणे, अपर पोलीस अधिक्षक,लाप्रवि.नाशिक परिक्षेत्र नाशिक तसेच पोलीस उप अधीक्षक श्री.किशोर चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक .शाम पवरे,पोलीस निरीक्षक श्री.दिपक करांडे,पोहेकॉ. तनवीर शेख,पोहेकॉ.सतिष जोशी,पोना. प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गंगुल,महीला पोकॉ.राधा खेमनर, चालक पोहेकॉ अशोक रक्ताटे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर यांच्या पथकाने केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post