लोकसभेच्या धक्क्यानंतर राज ठाकरे विधानसभेच्या तयारीसाठी राज्याच्या दौऱ्यावर


DNALive24 : वेब न्यूज, मुंबई
लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता भाजपच्या विरोधात राज्यभर सभा घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी चांगलाच धक्का बसला. स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्याअनुषंगाने ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. ते आपल्या दौऱ्याला पुण्यापासून सुरुवात करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरण्यासाठी राज ठाकरेंचा मनसे पक्षही सज्ज झाला आहे.

राज ठाकरे स्वत:देखील मैदानात उतरले असून ते आता नव्या जोमाने काम करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार आहेत.

पुण्यातील तीन दिवसाच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरेंनी पहिल्या टप्प्यात हक्काच्या अशा मुंबई, पुणे व नाशिक या तीन ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. त्यानंतर ते राज्यभरात फिरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post