सावेडी कचरा डेपो आग प्रकरण, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख पैठणकर निलंबित


DNALive24 : वेब टीम, अहमदनगर
सावेडी कचरा डेपोला आग लागल्याप्रकरणी प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांना निलंबित केले आहे.

महापालिकेच्या सावेडी कचरा डेपोला सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली होती. महापालिकेचा शेंडी- पोखर्डी रस्त्यावर कचरा डेपो आहे़. शहरासह उपनगरांतील कचरा संकलन करून तो डेपोत साठविला जातो़ साठविलेल्या कचऱ्यापासून खत बनविले जाते़ या ठिकाणी साठविलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली़ होती.

वारा असल्याने आग भडकली होती. कचऱ्यात प्लास्टिक असल्याने प्रशासनाला आग विझविण्यात यश आले नव्हते. या सर्व परिस्थितीला पैठणकर यांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. वारंवार चुकीची माहिती देऊन कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post